लैंगिक आरोग्य सामाजिक स्वास्थ्य गरजेचे : डॉ. सावंत
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवामूलभूत संकल्पना त्याची व्याप्ती व सद्यस्थिती यावर प्रकाश टाकून लैंगिक आरोग्याबाबत असणारी अनास्था ही बहुतांशी वेळा घरगुती हिंसाचार व घटस्फोटाचे कारण ठरू शकते. या विषयाबद्दल उघडपणे चर्चा होत नाही. गॅझेटच्या माध्यमातून तरुण वर्ग या विषयाची माहिती घेतो. लैंगिक आरोग्य सामाजिक स्वास्थासाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. राजसिंह सावंत यांनी केले.
सायबर महाविद्यालय येथे आयोजित 'फेसबुक लाईव्ह गाठ भेट' या मुलाखतपर कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, गॅझेटमधील माहिती खूप रंजक व उत्तेजित करणारी असते. कदाचित त्यामुळे समाजातील विकृत गोष्टींना खतपाणी मिळत जाते. त्यामुळे माणसाला जसे शारीरिक, मानसिक आजार असूशकतात.
यावेळी डॉ. आर. ए. शिंदे, विश्वस्त सी. ए. क्रषिकेश शिंदे, संचालक डॉ. चंद्रकांत दळवी, डॉ. एस. व्ही. शिरोळ, प्रा. मधुरा माने आदी उपस्थित होते.