४ सप्टेंबर हा दिवस जागतिक लैंगिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांमध्ये लैंगिक आरोग्या बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. २०१० पासून जगभर लैंगिक आरोग्य दिन साजरा करणसाठी जागतिक लैंगिक आरोग्य संघटना (WAS ) प्रय त्नशील असून वेगवेगळया थीम चा वापर करून लैंगिक आरोग्या बाबत विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. ‘डिजिटल जगातील लैंगिक आरोग्य ’ ही या वर्षीच्या लैंगिक आरोग्य दिनाची थीम आहे. भारतातही जागतिक लैंगिक आरोग्य संघटना (WAS ), कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन ऍण्ड पेरेंटहूड इंटरनॅशनल (CSEPI ) या संघटनेच्या वतीने देशभर विविध लैंगिक आरोग्या विषयक कार्यक्रम आयोजित केले जातात.
आपल्या शारीरिक आरोग्या बाबत सर्वजण जागरूक असतात मात्र ही जागरूकता मानसिक व लैंगिक आरोग्याबाबत दिसून येत नाही. थोडासा ताप आला तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटून औषधोपचार सुरू करतो. परंतु आपणास काही मानसिक त्रास जाणवत असेल किंवा काही लैंगिक समस्या असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे बाबत तत्परता दाखवत नाही. औषधोपचाराच्या अभावामुळे मानसिक किंवा लैंगिक समस्येची तीव्रता वाढून गंभीर मनोविकार किंवा लैंगिक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपणास शारीरिक समस्यां बरोबरच मानसिक किंवा लैंगिक आजाराची लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्क ठरते.
भारतात लैंगिक आरोग्याबाबत बोलायला अजूनही लोक संकोचतात. भारतातील अनेक घरामध्ये ‘सेक्स’ हा विषय निषिध्द समजला जात असलेने या विषया वर चर्चा करायला बंदीच आहे. या विषयावर खुलेपणाने चर्चा होत नसलयाने तरूण मुलां मुलीं मध्ये लैंगिकतेविषयी गैरसमज वाढू लागतात. मात्र आधुनिक डिजिटल युगात घराघरात वैचारिक परिवर्तन दिसू लागले आहे. तरूण पिढीने लैंगिक विषयावर बोलायला सुरूवात केली आहे. विशेषतः डिजिटल, सोशल मिडीयात लैंगिकतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी या विषयावर चर्चा, विचारमंथन होऊ लागले आहे. याच विषयावर जनजागृती करणे साठी दरवर्षी ४ सप्टेंबर रोजी जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. लैंगिक आरोग्याचे महत्व ध्यानात घेऊन लैंगिकतेकडे आणि लैंगिक संबंधाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मत आहे. त्यामुळे पतीपत्नी मध्ये आनंददायक व सुरक्षित लैगिंक संबंध प्रस्थापित होऊन लैंगिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते. प्रत्येक स्त्री पुरूषांना लैंगिक इच्छा असते आणि हे मानवी जीवनातील एक नेहमीचा भाग आहे, हे सामाजिकदृष्टा स्विकारायला हवे. लोकांना लैंगिक इच्छा असली तरी सुरक्षित लैंगिक संबंधांना प्राधान्य द्यायला हवे. जोडीदाराबरोबर केलेले असुरक्षित लैंगिक संबंधामुळे अनेक लैंगिक संक्रमित आजार होण्याची शक्यता असते. तसेच एड्ससारखा आजारही असुरक्षित लैंगिक संबंधा मुळेच पसरण्याची अधिक शक्यता असते. असुरक्षित सेक्समुळे मुलींमध्ये नको असलेले गर्भारपण लादले जाऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी प्रत्येक लैंगिक संबंधाचवेळी निरोधचा वापर करायला हवा. निरोधाशिवाय स्त्रियांनी इतर गर्भनिरोधकांचा वापर करावा. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टळू शकते. तसेच जोपर्यंत शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या लैंगिक संबंधासाठी सक्षम होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध टाळायला हवेत. संततीप्रतिबंधक साधनांची माहिती घेऊन त्यांचा वापरयोग्य पध्दतीने करायला हवा. तसेच तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर योग्य पध्दतीने कुटुंबनियोजन करायला हवे.
लैंगिक आरोग्य चांगले असेल तर तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुरक्षित राहू शकतो. भारतीय शिक्षण व्यवस्थेत अजून तरी लैंगिक शिक्षण दिले जात नाही. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लैंगिक शिक्षण मिळाल्यास वैवाहिक जीवनात त्यांचे लैंगिक आरोग्य चांगले राहणेस मदत होईल. विद्यार्थ्याना लैंगिक शिक्षण देणे बाबतचा निर्णय केंद्रशासन स्तरावर प्रलंबित असला तरी शासन याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना शाळेतच लैंगिक शिक्षण मिळू शकेल. लैंगिकतेविषी मुलांबरोबर बोलताना पालकांनी टाळाटाळ करू नये. तुम्ही तुमची लैंगिक इच्छा लपवून ठेवल्यास तुम्हाला नैराश्य येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील लैंगिकता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणूनच ते निषिध्द नाही. लैंगिकतेविषी बोलताना किंवा त्या बद्दल काही प्रश्न विचारताना कोणीही संकोच बाळगू नये.
कोवीड या आजाराने गेले वर्षभरापासून जगभर थैमान घातलेले आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन मुळे, बंदिस्त जीवन जगणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्या बरोबरच लैंगिक आरोग्या वरही परिणाम झालेला आहे. कोविडमुळे लोकांची कामेच्छा लक्षणीय स्वरूपात कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पतीपत्नींच लैंगिक संबंधांचे प्रमाण ही घटलेले आहे; या उलट हस्तमैथुनाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढल्याचे दिसून आले आहे. कोविडमुळे पुरूषांचे लैंगिक संबंधामध्ये वाढ झालयाचे आढळून आले आहे. पुरूषांमध्ये लैंगिक दुर्बलता (ED) व लैंगिक विकाराचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. पतीपत्नीं मधील वादविवाद वाढून घरगुती हिंसाचाराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेचे या पाहणीत नमुद केलेले आहे.
सध्याच्या आभासी डिजिटल जगात इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी पतीपत्नीं मधील दुरावा अधिक वाढलेला आहे. मोबाईल फोनचा अतिवापर हा पतीपत्नींच्या वादविवादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तसेच समाजमाध्यमांचा अति प्रमाणात वापरामुळे पतीपत्नीं मधील कलह अधिकच वाढवत आहे. तसेच रात्री उशीरार्पंत वेबसिरीज पाहत असलेने निद्रानाशाची समस्याही बऱ्याच जोडप्यामध्ये दिसून येत आहे. इंटरनेट डेटा स्वस्त झालेने इंटरनेटचा वापरही लक्षणी प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे पॉर्न पाहणेचे प्रमाण वाढून पॉर्नचे व्यसन जडलेले युवकांचे प्रमाण ही वाढू लागले आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर केवळ आवश्यक कारणां साठीच करणे आवश्यक आहे. तसेच पतीपत्नींनी समाजमाध्यमांचा अतिवापर टाळून एकमेकांना पुरेसा वेळ दिलयास पतीपत्नींचे नातेसंबंध सुदृढ राहणेस निश्चितच मदत होईल.
- डॉ. राजसिंह सावंत
लैंगिक समस्या तज्ञ कोल्हपूर
जॉईंट सेक्रेटरी, नॅशनल सेक्सॉलॉजिस्ट असोसिएशन